Productivity बद्दलची अनेक पुस्तकं वाचून व techniques वापरून त्यातील उपयोगी वाटलेल्या काही सोप्या टीप्स शेअर करत आहे.
1. Schedule-based tasks.
तुमच्याकडे स्मार्टफोन आहे म्हणजे त्यात कॅलेंडर आहे. ज्यावेळी डोक्यात एखादं काम येईल त्यावेळी ताबडतोब ते कॅलेंडरमध्ये, त्यावेळी योग्य वाटते ती तारीख आणि वेळ फोनमधील कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायची. ज्यावेळी एखाद्या कामाचं calendar notification येईल तेव्हा एक तर ते काम करायचं किंवा reschedule करायचं. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कॅलेंडरमधून काढून टाकायचं नाही.
नखं कापायची आहेत? कॅलेंडर एन्ट्री.
बिल भरायचे आहे? कॅलेंडर एन्ट्री.
पिझ्झा खावासा वाटतोय? कॅलेंडर एन्ट्री.
अंतराळवीर बनायचं आहे? कॅलेंडर एन्ट्री.
डोक्यात काहीही म्हणजे अगदी काहीही न ठेवता प्रत्येक गोष्ट कॅलेंडरमध्ये गेलीच पाहिजे हा अट्टाहास अत्यावश्यक आहे.
2. Checklist.
Checklists या फक्त अंतराळवीर, पायलट्स, आणि सर्जन यांच्यासाठी नसतात. आपण दैनंदिन जीवनातही त्या उत्तम प्रकारे वापरू शकतो.
उदाहणादाखल - घर बंद करून आठ-दहा दिवस बाहेरगावी जायचे असेल तर काय करावे याची checklist. 2015 मध्ये आम्ही पहिली outstation ट्रीप केली तेव्हा बनवलेली checklist मी अजून वापरत आहे व खूप उपयुक्त ठरली आहे.
3. A place for everything and everything in its place.
याला जपानमध्ये seiton म्हणतात.
उदाहणादाखल - पाच मोठे बॉक्सेस घ्या. त्यावर electronics, electrical, hardware, stationary व miscellaneous अशी लेबल लावा. त्या त्या वस्तू त्या त्या बॉक्समध्येच ठेवायची सवय लावा. बराच वेळ व कष्ट वाचतील.
हाच concept आपण अनेक प्रकारे वापरू शकतो.
A time for everything and everything in its time.
A budget for everything and everything within its budget.
A process for everything and everything by the process.
4. Objective metrics for almost everything.
ऑफिसमध्ये अथवा व्यवसायात अनेक प्रकारच्या नंबर्सवर बारकाईने लक्ष ठेवणारे आपण खाजगी आयुष्यात मेट्रिक्सबद्दल तेव्हढेच उदासीन असतो. आपल्या बऱ्याचश्या गोष्टी हवेत असतात.
"वजन कमी करायचंय". हो, पण किती? कधीपर्यंत?
"सेव्हींग करायचंय". दर महिन्याला किती टक्के?
जोपर्यंत आपण आपल्या dreams समोर पक्के नंबर्स मांडत नाही तोपर्यंत त्यांचे targets बनत नाहीत, आणि मुळात टार्गेटच नसेल तर तुम्ही ते गाठणार कसं?
मथळ्यात मी almost हा शब्द जाणीपूर्वक वापरलाय. काही गोष्टी - आईवडिलांची माया, भावंडांचं, मित्रमैत्रिणींचं निर्व्याज प्रेम, आणि मुख्य म्हणजे देवावरची निखळ भक्ती व श्रद्धा - या कुठल्याही मोजमापाच्या, देण्याघेण्याच्या हिशोबाच्या पलीकडेच राहू द्याव्यात.
5. Productivity बनायचं असेल तर सर्वात महत्वाची आणि आवश्यक गोष्ट म्हणजे स्वयंप्रेरणा व स्वयंशिस्त (self-motivation and self-discipline).
चांगल्या गोष्टी, कोणी सांगतंय म्हणून नव्हे तर "मला स्वतःला अजून चांगलं बनायचं आहे" या विचाराने कराव्यात, आणि कुणी स्तुती, प्रशंसा करत नसेल तरीही शांतपणे करत राहाव्यात.
अर्थात यातील प्रत्येक मुद्यावर एक एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकते एवढा हा विषय मोठा आहे. तूर्तास इतकेच पुरे.
तुम्ही यातील एखादी गोष्ट करत नसाल तर महिनाभर तरी नक्की करून पहा. तसेच, तुमच्याकडे असलेल्या productivity टीप्स जाणून घ्यायला आवडेल!
No comments:
Post a Comment